नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आता ईडी अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाच्या धाडीत यावेळी दुबई आणि अरब राष्ट्रात कांद्याची बोगस निर्यात केली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे हवाला व्यवहाराचे गुन्हे दाखल होणार आहेत. 


कांदा व्यापारी कोट्यवधी रुपयांची रोकड हवाला मार्फत पाठवत असल्याची संशयास्पद कागदपत्र समोर आलीत. काही व्यापारी तर शेतक-याला पैसे न देता बार्टर पद्धतीने लुटत असल्याचं समोर आलंय. 


यात प्रमुख कांदा व्यापारी संघाचे अनेक पदाधिकारी ईडीच्या नजरेत आलेत. यात अनेक जण बक्कळ नफा कमावत असून आयकर विभागाच्या धाडसत्राची व्याप्ती अधिक होणार आहे. आता एकूण १४० लोकांचे व्यवहार त्यांच्या बेकायदेशीर कंपन्या यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे.