अरेरे! वाईट घटना, आई आणि मुलाने एकाचवेळी घेतला गळफास
आई आणि मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
सोलापूर : सोलापूरमधील शेळगी परिसरात मुलगा आणि आईने राहत्या घरी एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आई आणि मुलगा यांनी केलेल्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक ( 62 वर्ष ) आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक ( 42 वर्ष ) असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे.
सकाळपासून घरात सामसूम दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आत डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.