उद्योगांसाठी संपादित जमिनी मोकळ्या करणार - उद्योगमंत्री देसाई
उद्योगांसाठी संपादित जमिनी मोकळ्या करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलिबाग येथे केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मिळण्याची शक्यता निर्माण झालेय.
रायगड : उद्योगांसाठी संपादित जमिनी मोकळ्या करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलिबाग येथे केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मिळण्याची शक्यता निर्माण झालेय.
भूसंपादनाचे शिक्के काढणार
उद्योगांसाठी संपादित केलेल्या किंवा भूसंपादनाचे शिक्के असलेल्या कोकणातील जमिनी आता मोकळया होणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी तशी जाहीर घोषणाच केली आहे.
शिवसेनेचा जाहीर मेळावा
अलिबाग येथे शुक्रवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात बोलताना सुभाष देसाई यांनी हा मुददा प्रामुख्याने उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या जमिनिंच्या सातबारा उताऱ्यांवर नुसते शिक्के मारून अडकवून ठेवल्या. त्याचा शेतकऱ्यांना काहीच लाभ नाही. या जमिनी मोकळया करण्याची गरज आहे, असे देसाई म्हणालेत.
सातबारा उतारा कोरा करणार
ज्या जमिनी विनावापर पडून आहेत. ज्यांची उद्योगांना गरज नाही त्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील शिक्के उठवण्याचा निर्णय केला जाईल, असे देसार्इ यांनी यावेळी सांगितले.