अकोला मनपात विरोधकांकडून टेबल-खुर्च्यांची फेकाफेक
अकोला महापालिकेतील गोंधळाची परंपरा सर्वसाधारण सभेतही पहायला मिळालीय. शहरातील नायगाव डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी टेबल-खुर्च्यांची फेकाफेक केलीय.
अकोला : अकोला महापालिकेतील गोंधळाची परंपरा सर्वसाधारण सभेतही पहायला मिळालीय. शहरातील नायगाव डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी टेबल-खुर्च्यांची फेकाफेक केलीय.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
या गोंधळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिपच्या नगरसेवकांचा सहभाग होता. नायगावातून डंपिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक रहीम पेंटर यांनी केली. या मागणीनंतर सभागृहात गोंधळ वाढत गेलाय.
या गोंधळातच महापौर विजय अग्रवाल यांनी अवघ्या दहा मिनिटात सभा आटोपती घेतली.
याआधी २ नोव्हेंबरच्या सभेतही सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी तोडफोड केली होती.
काही अपवाद सोडले तर अकोला महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत तोडफोड आणि साहित्याची फेकाफेकीच्या घटना घडल्यात. त्यामुळे बातम्यांमध्ये झळकण्यासाठी आणि चमकोगीरीसाठीच अकोल्यातील नगरसेवक तोडफोड करतात का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.