मुंबई : आमदार असताना 'आपला माणूस' म्हणवून घेणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना 'आप' कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची झळ बसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरिमन पॉंईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आज भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा बँकेत गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आपच्या संतप्त आंदोलकांनी केली.



ज्या दरोडेखोरांनी मुंबई बँकेत दरोडा घातला. त्यांना अटक करण्यात यावी. लोकांना संरक्षण द्यायचे सोडून ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांना सरकार संरक्षण देत आहे असा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला. आपच्या या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी अटक करून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणण्यात आले.