मुंबई : सरकारच्या ऑटो रिक्षाच स्टेअरिंग तुमच्या हातात आहे पण कुठे जायचं हे प्रवासी ठरवतात. इथे चालकलाही रोजगर मिळत नाही. त्यामुळे सरकारची ही ऑटो रिक्षा नक्की कुठे चाललीये ? हे कोणालाच माहीत नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार पुण्यावर अन्याय करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेला सरकारकडून अनुदान नसून दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. मुंबईत १० ते १५ हजार टेस्टिंग करायला पाहिजे नाहीतर दुसरी वेव्ह येईल. पुण्यात टेस्टिंग वाढवलं म्हणून मृत्यूदर कमी असल्याचे ते म्हणाले. दिल्लीत अमित शाह यांनी लक्ष घातल्याने मृत्यूदर कमी झाल्याचेही ते म्हणाले.


सरकार आधी चालवून दाखवा, पाडायचं दूर, आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही, तुम्ही अंतर्विरोधानच सरकार पडेल. जणूकाही जनतेने निवडून दिलं आहे अशा तोऱ्यात काही नेते बोलतात, आम्ही बेईमानी सरकार आहे. जमिनीवर राजकारण करणारे आम्ही आहोत, आम्ही संघर्ष करत राहणार, कोरनाचं संकटात सहकार्य पण कोणावर अन्याय होत असेल तर तर समोर आणणार असल्याचे ते म्हणाले.  


 १ तारखेला दुधाचं आंदोलन करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी आणि टिळकांची पुण्यतिथी शताब्दी आहे. म्हणून त्यादिवशी आंदोलन, अहिंसक आंदोलन असेल. कोणताही आंदोलक दूध रस्त्यांवर ओतणार नाही असे आवाहन देखील त्यांनी केले.



महत्वाचे मुद्दे  


कोणत्याही नियुक्त्या करण्यास न्यायालयाकडून स्थिगिती दिली आहे. ही चिंतेची बाब 


ओबीसीच्या आंदोलनाला धक्का बसू नये आणि मराठा आरक्षण ठिकाव


राममंदिर होणं हे आमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, कोट्यवधी लोकांसाठे परमोच्च आनंदाचा क्षण आहे. ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी जावं, मी जिथे असेल तिथे आनंद साजरा करणार असल्याचे ते म्हणाले. 


युरियाचा काळाबाजार सुरू आहे, तुटवडा नाहीये


मुलाखतीत विद्वान संपादक त्यांनी साखरेबाबत प्रश्न विचारतात त्यावर मुख्यमंत्री आदेश बांदेकरचं उदाहरण देतात हे काय सुरू आहे


आत्मनिर्भरमधून महाराष्ट्रला सर्वाधिक लोन मिळालं आहे, ३० हजार कोटी रुपये आतापर्यंत मिळालं आहे


गलवान vally मध्ये जे घडलं त्यामध्ये कणखर पंतप्रधानांनी कणखर भूमिका घेतली


९४-९५ , २००९, २०१३ आपली भूमिका चीनने घेतली मात्र आत्ता पंतप्रधानांनी कणखर भूमिका घेतली