अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : अवयवदान विषयीची जनजागृती व्यापक प्रमाणात होत आहेत.  ब्रेन डेड रुग्णाचे अवयव कुणाचा जीव वाचवू शकतात, ही संकल्पना आता लोकांना पटू लागली आहे. गोंदिया येथील रहिवासी झनेश पसीने यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झनेश पसीने यांचे हृदय आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडोअर’ द्वारे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठवण्यात आले.


गणेशोत्सवादरम्यान अवयव दानासंबंधी झी २४ तासतर्फे विशेष मोहिम राबवली जात आहे. नागपुरातून ४९ वर्षीय व्यक्तीचं यकृत, हृदय, डोळे, किडनी, त्वचा दान करण्यात आली.काही दिवसांपूर्वी गोंदीयातल्या झनेश पशीने यांना ब्रेन हेमरेजचा झटका आला. बुधवारी त्यांचा नागपुरात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. 


झनेश यांचे डोळे, त्वचा, किडनी गरजू रूग्णांना दान करण्यात आले. तर हृदय आणि यकृत निर्धारीत वेळेत विमानतळावर पोहोचवण्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला. अवघ्या ३ मिनिट ५८ सेकंदात हृदय आणि यकृत विमानतळावर पोहोचवण्यात आलं. 


मरणानंतर जीवन आहे का हा प्रश्न जगात अनादी अनंत कालापासून आहे. त्याचं उत्तर मिळालेलं नाही. पण मरणानंतर अवयवदान केल्यास अनेक जीवांना नवं आयुष्य मिळू शकतं हे वारंवार अशा उदाहरणातून सिद्ध होतंय. त्याचसाठी झी २४ तासनेही महाअवयवदानासारखा महाउपक्रम राज्यात सुरू केलाय. याचा प्रसार प्रचार होणं गरजेचं आहे.