शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल, पालघर-रायगडची यांच्याकडे जबाबदारी
शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत. रवींद्र फाटक, अनंत तरे, संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.
मुंबई : शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत. रवींद्र फाटक, अनंत तरे, संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.
पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख अनंत तरे यांना आता रायगड जिल्हयातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, आणि पेन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्हयातील या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून त्यांची शिवसेनेनं नेमणूक करण्यात आली आहे.
ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे रायगड जिल्हयातील कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून काम पहाणार आहेत.
तसेच पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांना देण्यात आलीय. रवींद्र फाटक आता पालघर जिल्हासंपर्कप्रमुखपदी असणार आहेत.
रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांना सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे त्यांच्याकडील रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी काढण्यात आली आहे. यापुढे आदेश बांदेकर शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर दौरे करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.