केम, सोलापूर : शिवसंभू पाईक आणि श्री छत्रपती संभाजी राज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकेअर ब्लड बॅंक, सोलापूर आणि फुलराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समीर तळेकर आणि दत्ता तळेकर तसेच संभाजीराजे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिबिराचे उद्घघाटन सुरेश थिटे महाराज यांच्या हस्ते राजे छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आलं. या प्रसंगी थिटे महाराज यांनी बोलताना रक्तदान करण्यासाठी लोकांमध्ये जागृती केली, 'आज राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना रक्ताची गरज आहे. आपल्या रक्तादानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अनेक शिबिरात प्रत्येकानी सहभाग घेऊन रक्तदान करावं, असं आवाहान त्यांनी याप्रसंगी केलं. 


रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याना प्रमाणपत्र देखील देण्यात आलं. यावेळी राजे संभाजी महाराज उत्सव समिती सदस्य आणि केम ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक ग्रामस्थांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला अन् जनजागृती देखील केली. विशेष म्हणजे या शिबिरात येथील शिवाजी तळेकर आणि रेणूका तळेकर या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवसानिमित्त या दोघांनी प्रथम रक्तदान केलं. या उपक्रमाचे केम आणि परिसरातून कौतूक केलं जात आहे.