Amravati Bullock Cart Race : शेतकऱ्याच्या लेकीनं केली कमाल; UPSC चा अभ्यास करत जिंकली बैलगाडा शर्यत
तळेगावमधील शंकरपटात अर्थात बैलगाडी शर्यतीत विदर्भच (Vidarbha News) नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra news) शेकडो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. शेतीत पुरुष बरोबर महिला शेतकरी देखील काम करत असतात. त्यामुळे महिलांची हिंमत वाढावी, यासाठी एक दिवस आरक्षित करून बैलगाडा शर्यतीमध्ये (Bailgada Sharyat) सहभागी होण्यासाठी महिलांना संधी देण्यात आली होती.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कृषीप्रधान असलेल्या भारत देशातील महिला तरुणी आज कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. तीन चाकी ऑटोरिक्षापासून ते विमान चालवण्याचं काम महिला करत आहेत. शेतात राबताना अनेक महिला बैलगाडी देखील हाकतात. मात्र, बैलगाडा शर्यतीत क्वचितच महिलांचा सहभाग पहायला मिळतो. अमरावती (Amravati news) येथे बैलगाडा शर्यत जिंकण्याची कमाल एका शेतकऱ्याच्या लेकीनं केली आहे. महिलांच्या शंकरपटात यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या उन्नतीने बाजी मारली आहे (Amravati Bullock Cart Race).
अमरावती जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील तळेगाव दशासर या गावात महिलांच्या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या गावाची ओळखच शंकरपटाचे तळेगाव म्हणून आहे. त्याचे कारण असे की स्वतंत्र पूर्ण काळापासून कृषक सुधार मंडळाच्या वतीने या गावात शंकरपटाचे आयोजन करण्यात येत होते.
मात्र, पशु कायद्याच्या कचाट्यात बैलगाडा शर्यत अडकली आणि गावातील शंकरपटाचा उत्साह ओसरला, मात्र आता तबल 9 वर्षानंतर पुन्हा या गावात बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आली. येथे पुरुषांच्या बैलगाडा शर्यतीस शेवटच्या दिवशी विशेष बाब म्हणून महिलांसाठी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.
यात तळेगाव मधील 23 वर्षीय उन्नती लोया (Unnati loya) नावाच्या तरुणीने सहभाग घेतला. उन्नतीने केवळ 13 सेंकदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे उन्नती ही शेतकरी कन्या आहे. उन्नती सध्या नागपूरमध्ये यूपीएससीचा (UPSC) अभ्यास करत आहे.
तळेगावमधील या शंकरपटात विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतात राबतात. त्यामुळे महिलांची हिंमत वाढावी, यासाठी एक दिवस आरक्षित करून महिलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली होती.
खरं तर महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. एकावेळी एखाद्य वाहन चालवणं सोपं जाईल, पण बैलगाडा शर्यतमध्ये बैलगाडा पळवणे कठीण आहे. तरी देखील आज महिला मोठ्या हिमतीने या बैलगाडा शर्यतमध्ये सहभागी होऊन 'हम भी कीसी से कम नही' असं दाखवून दिले. महिलांची हबी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.