सांगली : ब्रम्हनाळ येथील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे दागिने सापडले आहेत. बोट पलटल्यानंतर यातील महिला वाहून गेल्या होत्या. तेंव्हा त्यांच्या जवळील दागिने आणि पैसे महापुराच्या पाण्यात बुडाले होते. दरम्यान 25 तोळे सोन्याची दागिने, रोख रक्कम, एक मोबाईल, आणि चांदीचे दागिने सापडले आहेत. पाणी कमी झाल्यानंतर आज ब्रम्हनाळमधील म्हसोबा कॉर्नर परिसरात या वस्तू दिसून आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सांगलीत आलेल्या महापुरात ग्रामपंचायतीच्या बोटीतून ब्रम्हनाळ येथील काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवत असताना बोट दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेट अनेकांचा जीव गेला होता. आज बोट दुर्घटनेत  मृत्युमुखी पडलेल्या महिलांचे दागिने सापडले आहेत. बोट पलटल्यानंतर महिला वाहून गेल्या होत्या. तेंव्हा त्यांच्या जवळील दागिने आणि पैसे महापुराच्या पाण्यात बुडाले होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने या वस्तू निदर्शनास आल्या आहेत.