२७ अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या दात्याला मदतीचा हात
जिल्ह्यातील कोळे इथल्या समीर नदाफ या युवकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु झालाय. समीर नदाफ हा युवक २७ अनाथ मुलांचा सांभाळ करतोय.
सातारा : जिल्ह्यातील कोळे इथल्या समीर नदाफ या युवकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु झालाय. समीर नदाफ हा युवक २७ अनाथ मुलांचा सांभाळ करतोय.
विशेष म्हणजे समीरची आई, वडील, पत्नी , भाऊ सगळेच त्याला या कामात साथ देतात. स्वतःच्या मुलांप्रमाणेच तो या सगळ्या मुलांना सांभाळतो. ही सगळी मुलं कोळे गावातल्या माध्यमिक विद्यालयात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. समीर नदाफनं त्याच्या या अनाथाश्रमाचं नाव जिजाऊ ठेवलंय.
याबाबतचं वृत्त झी मी़डियानं प्रसारित केलं होतं. ही बातमी पाहून जिजाऊ आश्रम शाळेला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झालाय. दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समीरच्या आश्रमशाळेला मदत दिलीय. झी मीडियाच्या या सकारात्मक सामाजिकतेचे सर्व स्तरातून कौतुक होतंय. तसंच मिळणा-या मदतीबद्दल नदाफ कुटुंबीयांनी "झी मीडिया"चे आभार मानलेत.