मुंबई: आमच्या उत्पादनांविषयी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे स्पष्टीकरण युरोलाइफ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेकडून देण्यात आले आहे. या कंपनीची सॅनिटायझर्स आणि काही उत्पादने कालबाह्य तारखेनंतरची असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. याविषयी कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. युरोलाइफ हेल्थकेअरचे चीफ मार्केटींग ऑफीसर विरेंदर धर म्हणाले की, या अहवालांच्या अगदी विरूद्ध, युरोलाइफच्या अनेक उत्पादनांच्या किंमती कोरोना व्हायरसच्या दृष्टीकोनातून कमी केल्या गेल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केटमधील कोणतीही बॉटल कालबाह्य तारखेनंतरची नाही. आमचे हँड सॅनिटायझर कंपनीतर्फे 2018 मध्ये परिचित केले गेले आणि आम्ही वास्तविकपणे त्याची किंमत 100 मिली. बॉटलसाठी रू. 250 ऐवजी रू.190/- इतकी कमी केली आहे. तरीही काही विशिष्ट उत्पादनांचे MRP बदलण्याचा निर्णय फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आला जो मार्केट आकलनावर आधारित तर्कसंगती राहाण्यासाठी होता कारण मार्केटमधील सर्व ब्रँडच्या उत्पादनांची MRP आमच्यापेक्षा जास्त होती. या परिस्थितीत आमच्या फक्त तीन उत्पादनांची MRP बदललेली आहे आणि बाकी सर्वामध्ये काही बदल झालेला नाही.


आम्ही यावर देखील जोर देऊ इच्छितो कि, कोरोनाव्हायरसच्या प्रसाराच्या दृष्टीकोनातून आम्ही आमची ASP किंमत (स्टॉकिस्टसाठी किंमती) 40-45%ने कमी केल्याचे धर यांनी सांगितले


शेल्फ लाइफच्या मुद्द्यावर श्री. धर म्हणाले, आमच्या सर्व सॅनिटायझर उत्पादनांचे शेल्फ लाइफ योग्य प्राधिकाऱ्यांतर्फे दिलेल्या प्रस्थापित मार्गदर्शक तत्वांनुसार आहे. तपासणी संस्थांनी अंमलात आणलेल्या प्रक्रियेची आम्ही प्रशंसा करतो आणि आम्ही त्यांच्यासह पूर्ण सहकार्य करत असल्याचे धर यांनी स्पष्ट केले.