मुंबई : मंगल देशा..पवित्र देशा..महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा...आज एक मे...दिल्लीचे तख्त राखण-या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस.. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन....हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली.  या निमित्तानं राज्यभरात विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 
महाराष्ट्र दिनी सारा महाराष्ट्र पाणीदार करण्यासाठी  पाणी फाऊंडेशन सज्ज झालंय. पाणी फाऊंडेशनव्दारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सगळ्यांनीच  महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान करावं असं आवाहन मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानं केलंय. आमिर स्वत: लातूरमध्ये श्रमदान करणार आहे..आमिर खान आणि किरण राव दोघं  प्रत्येक गावांमध्ये फिरतायेत. आमिर बरोबर किरण राव तसेच अनेक मान्यवरही श्रमदान करणार आहेत.....मिस्टर परफेक्शनिस्टच्या या कामाचं सगळीकडेचं कौतुक होतयं..बघुया आमिरने काय आवाहन केलय.