पुणे : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आपल्या असामान्य समाजकार्याने ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली अशा ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्रवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ( Sindhutai Sakpal passes away ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील मांजरी येथे सकाळी 8 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या त्या अनुयायी असल्याने दुपारी 12 वाजता ठोसर बागेत दफनविधी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली.


काही दिवसांपूर्वीच सिंधुताई सकपाळ यांनी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी केलेलं कार्य हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि अनेक देशांनी त्याची दखल घेतली.


सिंधूताई सकपाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. अनाथ मुलांचा सांभाळ करुन अशा मुलांना जगण्याची नवी दिशा देण्याचं काम सिंधुताई सकपाळ यांनी केलं. त्यांनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.