Pankaja Munde : भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू असं म्हणत दोन खास व्यक्तींची नावे घेतली. पंकजा मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली.  शेरो-शायरीतून त्यांनी वातावरण निर्मिती केली. बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार आहोत. त्यासाठी कंबर कसा, कोयते घासून ठेवा, तयारीला लागा, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. तसंच रणांगणात काली बनून आपण येणार आहोत असं सांगत, त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहायला सांगितलं. याद्वारे पंकजा मुंडे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे.  माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांच्याशी देखील संवाद साधला. 


ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेदेखील या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी हाके यांचा गोंडस लेकरु असा उल्लेख केला. तेव्हा उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला.  गोंडस लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही. काल त्यांनी व्हिडीओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाला. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण माझा सन्मान ठेवून हाके आले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 


माझ्या मेळाव्यासाठी 18 पगड जातीचे लोकं संपूर्ण महाराष्ट्रभरातून भगवान गडावर आले आहेत. माझ्या वडीलांनी तुमची जबाबदारी पदरात टाकली आहे. माझा पराभव झाल्यानंतरही तुम्ही मला जास्त मान सन्मान दिला. आता गावा-गावांमध्ये जाऊन मी दौरे करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे. मी माझ्या ऊसतोड कामगारांचे जीवन बदलल्या शिवाय शांत बसणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. महादेव जानकर माझे बंधू आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेले गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे म्हणत त्यांनी हाके यांचं कौतुक केलं.