गोंदिया :  जिल्ह्याला निसर्गाने भरभरून नैसर्गिक संपदा दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या  जिल्ह्यात सर्वत्र " पळसाच्या " झाडावर फुलांचा फुलोरा फुललाय. तर या पळसाच्या फुलांचा आस्वाद घेण्याकरिता विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी या झाडावर  गर्दी करीत आहेत.  या फुलांचा उपयोग होळीत नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी  करण्यात येतो हे विशेष आहे. 


पळसाच्या झाडांचं सौंदर्य 


लाल रंगाने, पक्ष्यांच्या गजबजाटाने न्हाऊन निघालेली पळसाची झाडे आहेत.  हे दृष्य आहेत गोंदिया जिल्ह्यातील... गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे असून या झाडापासून अनेक फायदे माणसाला तसेच पक्षांना देखील मिळतात ,या फुलापासून मिळणाऱ्या मिळणाऱ्या रसामुळे या झाडावर मोठ्या प्रमाणात विविध प्रजातीचे पक्षी सकाळ तसेच सायंकाळ चा सुमारास एकच गर्दी करीत असतात.


पळसाच्या झाडांवर पक्षी आकर्षित 


तर विशेष बाब म्हणजे या फुलाचा आस्वाद घेण्याकरिता युरोप येथून रेजी पेस्टर या नावाची मैना सतत दोन महिने या ठिकाणी ठाण मांडून असतात व मार्च अखेर त्या आपल्या परतीचा प्रवासाला लागतात शिवाय अनेक स्थानिक पक्षी सुद्धा या पळसाचा फुलाचा आनंद या दरम्यान घेत असतात , तर या फुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फुलाचा वापर त्याचा नैसर्गिक रंग बनवून होळी उत्सव दरम्यान आजही  केला जात असतो नैसर्गिक कलर असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम देखील शरीरावर होत नाही हे विशेष 


 गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर ह्या फुलाचा फुलोऱ्या मुळे निसर्ग या रंगात नाहून निघत असल्याचे चित्र असून ऐन होळीच्या पर्वावर निसर्ग सुद्धा आपल्या रंगाची उधळण करून या होळीचा पर्वात  सामील होत असल्याचे सुखावणारं दृष्य दिसत आहे.