पालघर पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत, हे आहेत उमेदवार
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट झालंय. माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.
मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट झालंय. माजी खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.
एकूण ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी वसंत भसारा आणि राजेश पाटील या बहुजन विकास आघाडीच्या दोघा डमी उमेदवारींनी अर्ज मागे घेतले.
आता दोघा अपक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे ही पोटनिवडणूक बहुरंगी होणार हे स्पष्ट झालं आहे.