पालघर : जव्हार तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आपल्या शेतात पहाटे ६ च्या सुमारास झाडाला गळफास घेऊन धनजी यांनी आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनजी यांनी मागील वर्षी ४२ हजार २०७ रूपये ठाणे बँकचं कर्ज घेतलं होत. मात्र, मागील वर्षी भाजीपाल्याचे पिक चांगले न आल्यामुळे आणि भाजीपाला लागवडीला रोग लागल्यामुळे भाजीपाला लागवडीचे नुकसान झालं. त्यामुळे यंदा भाजीपाल्याची लागवड केली नाही. 


यासोबतच दिवसेंदिवस घेतलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज वाढतच चाललं होतं. तसेच शासनाच्या पिक कर्ज माफीचा अर्जही देखील केला होता. मात्र, इतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आणि आपले नाही झाले या नैराश्येतुन धनजी यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी आणि त्यांच्या मुलांनी सांगितले.