मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतल्या मतदानानंतर तालुक्यातील बुथ क्र.१७ चिंचरे मधील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरीकांनीसमोर आणला.बुथ क्र.१७ चे निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत व मनोहर खांदे यांना मतदान झाल्यावर बसमधून मतपेट्या नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सदर अधिकाऱ्यांनी चिंचरे येथून खासगी वाहन क्र.एम एच ०३ ,बीएस ०९८० मधून मतपेट्या बेकायदेशीर पणे घेऊन जात होते. दक्ष नागरीकांना सदर प्रकार कळताच त्यांनी किराट येथे खासगी वाहन थांबवून जाब विचारला, त्यावेळी संबंधित मुजोर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलवले असता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच खासगी वाहनाला मनोर पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिली. दरम्यान मतपेट्या खासगी वाहनातुन नेणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल अस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय.