पालघर : पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दरोडेखोर समजून दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून CID डहाणू कोर्टात ४५०० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ११ अल्पवयीन आरोपींसह एकूण १६९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 एप्रिल 2020 रोजी दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (CID) सोपवला.


लॉकडाऊनच्या काळात पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधुंना मारहाण करुन त्यांची हत्या झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली होती. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी नाराजीचा सूर आळवत यातून दोषींची सुटका नाही हे ठामपणे सांगितलं होतं.