पालघरः काळ्या जादूची भिती घालून महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार, पतीच्या मित्रांनीच केले घृणास्पद कृत्य
Crime News In Marathi: पालघरमधून एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. काळी जादूची भीती घालत एका महिलेवर पाच जणांचा बलात्कार
Maharashtra Crime News: घरातील वास्तू दोष आणि अडचणी दूर करण्याचा अमिष दाखवत पाच नराधमांनी एका महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पाचही आरोपी हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेला घरावर व तिच्या पतीवर कोणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले होते. त्यामुळंच घरावर सतत संकट येते. घरावरील संकट दूर करण्यासाठी काही पूजा व अनुष्ठान करावे लागतील, असं महिलेला सांगून तिला घाबरवण्यात आले. महिलेनेही त्यांना होकार देऊन पूजा करण्यासाठी परवानगी दिली.
त्यांनंतर एप्रिल 2018मध्ये पाचही आरोपींनी महिलेच्या घरी जाण्यास सुरुवात केली. जेव्हा महिला एकटीच घरी असायची तेव्हाच आरोपी जायचे. त्यानंतर आरोपी काळी जादू करण्याचे नाटक करायाचे. त्या दरम्यान महिलेल्या पंचामृतात गुंगीचे औषध देऊन तिला पिण्यास द्यायचे. महिलेची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे. इतकंच नव्हे तर, आरोपींनी महिलेच्या घरी अनुष्ठान करण्यासाठी सोना आणि पैसेदेखील घेतले आहे. हे अनुष्ठान केल्यानंतर घरात शांती आणि सुख समृद्धी राहिल. त्याचबरोबर पतिला सरकारी नोकरीदेखील लागेल, असं आमिष दाखवले होते.
2019मध्ये आरोपींनी महिलेला ठाण्याच्या येउर जंगलात, मुख्य आरोपी असलेल्या कांदिवलीच्या घरात आणि लोनवाला येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवून तिच्यावर वारंवार रेप केला. तसंच, महिलेकडून 2.10 लाख रुपये आणि सोनेदेखील घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी हा त्रास सहन न झाल्यामुळं महिलेने पाच जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अधिक चौकशी व तपासानंतर रविंद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम या आरोपींना अटक केली आहे.
तलासरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय मुतादक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा आम्ही अधिक तपास करत असून पाच आरोपींनी य आधीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत व सगळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.