पालघर जि. प. निवडणूक : भाजपला फटका, शिवसेना-राष्ट्रवादीची मुसंडी
पालघरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला आहे
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेत निवडणूक होत आहे. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता होती. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सरशी होताना दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या ८ तालुक्यांमध्ये ६४ टक्के मतदान झाले होते. पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. पालघरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला आहे. येथे राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असून शिवसेनेचीही जोरदार मुसंडी मारली आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे सर्व निकाल हाती आले आहेत. ५७ जागा असून ४१ निकाल पैकी ११ जागांवर शिवसेना विजयी १३ जागांवर विजय मिळवत पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी मारली आहे. तर माकपने येथे आपली ताकद दाखवून दिली आहे. सुरुवातीला चार जागांवर माकपने विजय मिळवला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या पाच पैकी पाच जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. भाजपला सहा जगांवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, आता हाती आलेल्या वृत्तानुसार माकपाने सहा जागा जिंकल्या तर भाजपने १० जागा. या निवडणुकीत सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना ठरला असून १८ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक मिळवत १५ जाग जिंकल्या आहेत. त्यामुळे येथे महाविकासआघाडीची सत्ता येणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
पालघर जिल्हा परिषद निकाल : ५७ जागा
शिवसेना : १८
माकपा : ६
भाजप : १०
राष्ट्रवादी : १५
काँग्रेस : १
बविआ : ४
मनसे : ०
अपक्ष : ३