Pandharpur Crime News: पंढरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत भावावर कोयत्याने वार केला आहे. भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेणुका हॉटेलसमोर नाना निमकर यांच्यावर संशयित आरोपी अमित वाठारकर याने कोयत्याने वार केले. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 


घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अडवल्याने नाना निमकर यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास कऱण्यात येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातूनच आरोपी अमित वाठारकर याने हा हल्ला केला आहे. प्रेयसीच्या घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्याच रागातून त्याने प्रेयसीच्या चुलत भावावर कोयत्याने हल्ला चढवला. मात्र दिवसा-ढवळ्या आणि भरगर्दीत हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


पुण्यातही कोयत्याने हल्ला


पुण्यातील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नामांकित आयटी कंपनीचे कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने वार झाला. चाकूचा वार इतका गंभीर होता की त्यात तरुणीचा हात हा कोपऱ्यापासून तुटला होता. उपचारादरम्यान अतिरिक्त रक्तस्त्रामुळे तरुणीचा मृत्यू झाला. ही महिला याच कंपनीत अकाउंटचं काम पाहत होती. धक्कादायक बाब म्हणजे पैशाच्या वादावरून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याच समोर आलय. हल्ला करणारा आरोपी तिचाच सहकारीने होता. तरुणी  आणि सहकारी हल्लेखोर  यांच्यात उसने दिलेल्या पैशावरून वाद झाला. वाद इतका विकोपास गेला की त्याने तिच्यावर स्वयंपाक घरात वापरत असलेल्या चाकूने वार केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आणि कंपनीत तेवढी सुरक्षा असताना आलेखोर सहकार्य यांनी चाकू कसा नेला याबाबत पोलीस चौकशी करत आहे.