सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : पंढरपूर पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार शैला धनंजय गोडसे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. अपक्ष उमेदवार शैला गोडसे या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला संघटक होत्या. बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने त्यांचे पक्षातून निलंबन केल आहे. तरीही त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन गाजले होत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळी त्या तलावात पाणी आलेलं होतं.


सामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करत शैला गोडसे यांनी मतदारांना जागृत करण्याचे काम केलेल आहे. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना पाठिंबा दिलेला आहे. अपक्ष उमेदवार गोडसे यांच्या सभांमधून देशमुख साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे या मुद्द्यावर पोटतिडकीने भाषण करत आहेत.


2013 साली आझाद मैदानावर प्रभाकर भैया देशमुख यांनी उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी सोडावे यासाठी केलेलं आंदोलन प्रचंड गाजलेलं होतं. या आंदोलनामुळेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर अजित पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन आत्मक्लेश करून घेतला होता