पंढरपूर: देशात 4 राज्याचे आणि एक केंद्र शासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होत आहे. या निकालासोबतच पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोट निवडणूक झाली.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात प्रमुख चुरस आहे.  सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होत आहे. 


या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. २ लाख २४ हजार ०६८ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी मतमोजणी सुरू होत आहे. आज मतमोजणीच्या 38 फेऱ्या होणार आहेत. 


मतमोजणीसाठी सर्वांना पीपीईकीट दिलं जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी मतमोजणी केंद्रावर घेण्यात आली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोना चा संसर्ग असल्यामुळे  लॉकडाऊन आहे आणि पंढरपुरात जमावबंदीचा आदेश सुद्धा आहे त्यामुळे कोणत्याही नागरिकाला बाहेर फिरून मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही.