सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर : जीभेचे चोचले पुरवायला कोणाला आवडत नाहीत. प्रत्येकाला चमचमीत खायचं असतं. मात्र असा एक शेतकरी आहे जो चवदार खाणं किंवा चमचमीत खाण्यापेक्षा फक्त गुळ आणि शेंगदाणे खाण्यावर भर देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या शरीराला सर्व अन्न घटकांची गरज असते. त्यानुसार आपण एकतर आहार घेतो किंवा आपण जिभेचे चोचले पुरवतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडाची वाडी मधील शेतकरी नागनाथ गोरे फक्त गुळ आणि शेंगदाणे एवढंच खातात. 


तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटेल पण एक दोन वर्ष नाही बरं तब्बल 14 वर्ष हा शेतकरी गुळ आणि शेंगदाणे खात आहे. गोरे शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. वारकरी संप्रदायाशी ते जोडले आहेत. 



वयाच्या 48 वर्षापासून ते आज 62 वय झाले तरी त्यांनी गुळ आणि शेंगदाणे खाणं काही केल्या सोडलं नाही. लग्न समारंभात जाऊदे किंवा कार्यक्रमात तिथे पाणीही घेत नाहीत. पिशवीत असलेले गुळ शेंगदाणे खातात.


गुळ आणि शेंगदाणे हे खाणे जरी शरीरास लाभदायक असलं तरी जास्त खाऊन देखील त्रास होऊ शकतो. शेंगदाणेमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम तर गुळात लोहाचं प्रमाण जास्त असतं. शरीराला सहा घटकांची गरज असते ती यातून पूर्ण होत नाही. असं डॉक्टरांचे मत आहे.


गोरे यांना 14 वर्षापासून गूळ शेंगदाणे खाण्याचा जरी छंद असला तरी हे एक वेगळे उदाहरण आहे. मात्र अशी सवय शरीराला अयोग्य ठरू शकते असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची कमाल आहेच मात्र तुम्ही अशा प्रकारची कोणतीही गोष्ट करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.