COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर : आज पासून अधिक तथा पुरूषोत्तम मास सुरू झालाय. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरात सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने घेतलाय.


तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास आजपासून सुरू झाला असून आज पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट केलीये. 


अधिक मासात दर दिवशी एक लाख भाविक पंढरपूरात दर्शनासाठी येतात. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदीर समितीनं आजपासून १४ जूनपर्यंत व्हीआयपी आणि ऑनलाईन बुकींग दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 


तसेच स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी अर्धा तास दर्शनासाठी वेळ ठेवण्यात आली आहे. रोजच्या भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन रांगेत पिण्याचं पाणी तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.