पंढरपूर : आषाढी एकदशीच्या निमित्ताने दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि लवकर दर्शन व्हावे यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केलं आहे. मात्र मंदिर समितीचे काही सदस्य वारंवार दबाव आणून व्हीआयपी दर्शनास लोक सोडण्याचे आदेश देतात. यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे दर्शनास सोडण्यास नकार दिल्यानंतर मंदीर समिती सदस्यांनी कामावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करत मंदीरातील सर्व कर्मचारी एकत्र येत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. 


एकादशी जवळ आली असताना सदस्य आणि कर्मचारी यांच्यातला वाद सुरू झाला आहे.