मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतऱ्यांसाठी जाहीर केलेलं १० हजार कोटींचं पॅकेज पुरेसे नाही. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागेल नाहीतर विरोधी पक्षाला रस्त्यावर उतरावं लागेल असा थेट इशारा पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. त्यांनी आज दसऱ्याच्या शुभेच्छा देत भगवान गडावरून जनतेला संबोधित केलं. दरवर्षी दसऱ्यानिमित्त सावरगावातील भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात येतो. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत मांडत शर्यतीत कायम सक्रिय राहण्याचे आश्वासन जनतेला दिले. त्या म्हणाल्या, आज शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचं पॅकेज पुरेसे नाही. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागेल नाहीतर विरोधी पक्षाला रस्त्यावर उतरावं लागेल असं त्या म्हणाल्या. 


शिवाय याठिकाणी त्यांनी उस कामगारांची बाजू देखील ठामपणे मांडली. उसतोड कामगारांच्या संपात मी त्यांच्या सोबत आहे. उसतोड कामगारांसाठी आदळआपट करेल त्यांना योग्यतो न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करेल असं म्हणत त्यांनी  उसतोड कामगाराचा निर्णय मुंबई आणि दिल्लीत का होत नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला. 


निवडणुकीत माझा पराभव झाला पण अपयशाचं दुखः जनतेला जास्त झालं असं देखील त्या म्हणाल्या. निवडणुकीत पराभव झाला असला तरी आज मी शर्यतीत असल्याचं  त्यांनी सांगितले.