बीड : पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरु होती. एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला सगळ्यांचीच उत्सूकता वाढवली होती. कारण 12 डिसेंबरला आपण आपली भूमिका मांडणार असं त्यांनी म्हटलं होतं. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लोकांचं लक्ष लागून होतं. पण या वेळी त्यांच्या आधी एकनाथ खडसे यांनी असं काही जोरदार भाषण केलं. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्त केली. इतकंच नाही तर त्यांनी अनेकांचा समाचार ही घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी पहिल्यांदा नाव घेऊन प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांच्याशी त्यांनी याआधी चर्चा केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांनी नेमकी काय चर्चा केली. याबाबत अनेकांनाच उत्सूकता होती. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांना खडसे हे भाजप सोडतील का? असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, ती खडसेंची उद्विग्नता आहे. त्यांना गमवू नये. त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून आमचा प्रयत्न आहे. ते म्हणतात की, मला सगळे पर्याय उघडे आहेत. पण आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी त्यांना ज्ञान देणं चुकीचं आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ते 4 वर्ष मंत्रिपदाविना राहिले. त्यांची विल पावर खूप जबरदस्त आहे.'


एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर भाषण करताना म्हटलं होतं की, पंकजा मुंडे या भाजपमध्ये राहतील. पण माझा काय भरवसा ठेवू नका. खडसेंच्या या वक्तव्य़ानंतर ते भाजप सोडतील अशाच चर्चा सुरु आहेत. एकनाथ खडसे हे महाविकासआघाडीच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे.