COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : राज्य सराकारनं शिक्षकांसाठी एक खूषखबर दिलीय. यापुढं जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन होणार आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही घोषणा केलीय.त्यामुळे बदल्यांमधील 'चिरीमिरी संस्कृती'ला आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. 


यापूर्वी मॅन्यूअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्याचा वरदहस्त असेल त्या शिक्षकांनाच लाभ होत असे. काही शिक्षक 15-15 वर्ष दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहेत. अपंग, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रिकरण हवं असलेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.