अमरावती : अमरावतीत व्हॅलेटाईन डे निमित्ताने प्रेमविवाह करणार नाही अशी मुलींना शपथ दिली. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे असं मतं ट्विटरवरून त्यांनी व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर ऍसिड फेकणार नाही. जिवंत जाळणार नाही. वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलंय



अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ दिली. सध्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या शपथेची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही शपथ घेतली, असा कयास लावला जात आहे. पण राजकिय स्तरातून या शपथ विधी कार्यक्रमाचा निषेध नोंदवला आहे.



शपथेतील मजकूर पुढीलप्रमाणे 


"मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.


प्रेम करण्याला आमचा विरोध नाही. प्रेम वाईट आहे, असंही आमचं म्हणणं नाही. पण कुमारवयात मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची त्यांना जाणीव नसते. यामुळे ही शपथ घेतल्याचं महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांनी दिलं आहे.