Pankaja Munde Statement on Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील तापमान गरम झालंय. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह जनता रस्त्यावर उतरलीय. अनेक ठिकाणी मोर्चे, चक्काजाम आणि आंदोलन करण्यात येतं आहे. मंत्री धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अशात पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 


राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्यात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. त्या म्हणाल्यात की, माझ्या बीडमधील एका तरुणाची निर्घण हत्या झाली याचा मला सर्वात अधिक दु:ख आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून SIT लावण्याची मागणी मी केलीय. माझ्या विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं की, या प्रकरणात कोण मोठा कोण लहान असो कोणीही असो दोषीला शिक्षा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असं सांगितलं होतं. 


जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, दोषीला कठोर शिक्षा करुन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ असं म्हटलं असताना. मी एक मंत्री आहे, मी परत या विषयावर वारंवार काय बोलायचं? आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, या तपासाबद्दल सकारात्मक राहिला पाहिजे. जर एवढ्यानंतरही आम्ही या प्रकरणात सतत प्रश्न उपस्थिती करत राहू आणि मोर्चे काढू तर हा सरकारवर विश्वास नाही, असं दर्शविलं जाईल. माझ्या मनात कुठलंही प्रश्नचिन्ह नाही की, गृहमंत्री यात कुठल्याप्रकारची गय करतील. माझ्या मनात जर पूर्ण विश्वास आहे, तर रोज रोज या विषयावर बोलाव अशी माझी मानसिकता नाही.


 


हेसुद्धा वाचा - 'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट


 


माझ्या राजकीय प्रवास पाहा मी कधी कुठल्या विषयातून वेगळा विषय काढून राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय. त्यांनी शब्द दिल्यावरही आम्ही प्रश्न उपस्थितीत करत असू तर आमचं आमच्या नेतृत्वावर विश्वास नाही असं दिसून येईल. 


'जेव्हा ही हत्या झाली तेव्हा मी तिथे उपस्थितीत होती का? जर मी तिथे नव्हती तर मी कोणाचं नाव घेऊन का आरोप करु. संतोष देशमुख माझ्या कार्यकर्त्या होता. त्याचा लेकरबाळांचा चेहरा पाहून मला काय वाटतं आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मला भेटू पण दिलं नाही. फक्त मलाच या भेटीपासून वंचित ठेलवं. या प्रकरणात मी बोलत नाहीय, असा जो आरोप होतोय त्यात काही तथ्य नाही. 
गेल्या 5 वर्षांपासून मी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहे. मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे. साधी आमदार नाही, साधी जिल्हा परिषद सदस्य नाही. मग मी यामध्ये काय उत्तर देऊ. कोण अधिकारी कोणाचे आहेत, कोण अधिकारी कुठून आलेत, हे मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाचा उपमुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या यंत्रणेनी ते आणलेत. ते देखील म्हणतात की, यात तपास लागला पाहिजे, आरोपीचा शोध लागला पाहिजे. माझ्या संतोष देशमुखला ज्या दिवशी न्याय मिळेल, तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल.'