औरंगाबाद : पंकजा मुंडे समर्थकांनी आज पुन्हा राडा केला. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. विधान परिषदेत डावलल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक अजूनही नाराज आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे समर्थकाकडून भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.


पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकीट न दिल्यामुळे त्यांचं समर्थक नाराज आहेत. आज बीडमध्ये ही मुंडे समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.


विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होतेय. पंकजा मुंडे यांच्याकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.