Pankaja Munde : पंकजा मुंडे अखेर सभागृहात परतल्या आहेत... पंकजा मुंडेंनी आमदारकीची शपथ घेतली आहे... विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी विजय साकारला होता.. तेव्हा वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष करण्यात आला होता.. मात्र आता पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का याचीही चर्चा आता सुरु झालीय. आणि खुद्द पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानेच ती चर्चा सुरु झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये पराभूत झाल्याने पंकजा मुंडे पहिल्यांदाच मुख्य प्रवाहात दिसतायत.. मुंडेंचा बालेकिल्या असणा-या बीडच्या परळी मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता.. या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवास पंकजा मुंडेंच्या नशिबी आला.


2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांच्या जागेवर विधानसभेची उमेदवारी त्यांची कन्या पंकजा मुंडेंना देण्यात आली.. याचवेळी मुंडे कुटुंबियांमधला संघर्षही दिसून आला.. याच संघर्षातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.. 2014 च्या निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढाई रंगली. मात्र यात पंकजा मुंडेंनीच बाजी मारली.. 


राज्यात 2014 मध्ये भाजप-शिवसेनेचं महायुतीचं सरकार आलं.. पंकजा मुंडेंना लाल दिवा मिळाला. आमदार पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची संधी मिळाली..  ग्रामविकासमंत्रिपद पंकजा मुंडेंनी भुषवलं.. गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्या.


मात्र,  2019 ला चित्र पालटलं.. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना धुळ चारली.. त्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन झालंच नाही.. पंकजा मुंडेंना अखेर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंऐवजी तिकीट देण्यात आलं.. मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला.. मात्र विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंनी विजय साकारला.. आणि आता आमदारकीनंतर पंकजा मुंडेंना पुन्हा लाल दिवा मिळणार का याचीच चर्चा सुरु झालीय.