Pankaja Munde : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचं उघड झाल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. यानंतर राज्यभरात अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याच्यारांच्या घटनांविरोधात भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात होत असलेल्या बलात्कार आणि महिलेवर अत्याचाराच्या घटना ऐकून मला खूप वेदना होत आहेत. अत्याचांरांना बळी पडणाऱ्या पिडीतांना न्याय मिळालाच पाहिजे असं पकंजा मुंडे म्हणाल्या. बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.  


निलंगा मतदारसंघात गेल्या चार दिवसांपासून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची जन सन्मान पदयात्रा सुरू आहे. या जन सन्मान पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे.  ही पदयात्रा आता वलांडी येथे पोहोचली आहे. या पदयात्रेत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या सहभागी झाले होत्या. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.


बदलापूर प्रकरणावरून अजित पवार संतापले


बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचं गुप्तांग कापून टाका असे अजित पवार म्हणाले.  विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही अजित पवार यांनी यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली... बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय..
बदलापूर घटनेनंतर लातूर पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत. प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षतेसाठी विविध पथकं स्थापन करण्यात आलीत. पोलीस अधिका-यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याबद्दलची माहिती दिली. तसंच असुरक्षित वाटल्यास 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधायचं आवाहनही केलं.