बीड : Bhagwan Bhakti Gad Dussehra Melava : आपला आवाज फक्त बीड आणि मुंबई पुरता नाहीतर आता दिल्लीत घुमवायचा आहे. पंकजा मुंडे यांचे प्रेमळ रूप तुम्ही पाहिले आहे. आता दुर्गेचे रूप दिसणार आहे, अशी घोषणा खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी दसरा मेळाव्यात केली. त्या पुढे म्हणाल्या, हा पक्षाचा मेळावा नाही, राजकीय मेळावा नाही, हा जनसामान्यांच्या मेळावा आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा हा मेळावा आहे. (Pankaja Munde's Durga form will be seen - Pritam Munde)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दसरा मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पंकजा मुंडे यांच्या आधी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या,  तुम्ही उन्हात बसला आहात. हे तुमचे प्रेम आहे. आता आपण मागे हटायचे नाही. दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवायचाय. आतापासून कामाला लागले पाहिजे. 


दरम्यान, पंकजा मुंडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून हे मेळावे ऑनलाईन पद्धतीने होत होते. मात्र पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर दसरा मेळावा झाला. दरम्यान मेळाव्याला जात असतांना पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाण घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा लँडींग करावे लागले. 


हेलिकॉप्टचा तांत्रिक बिघाड दूर केनंतर हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली आहे. सावरगावच्या दिशेने जात असताना पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पंकजा मुंडे गोपीनाथ गड येथून औरंगाबाद येथे जाणार होत्या. तेथून त्या सावरगावला जाणार होत्या. परंतु त्यांनी हवाई मार्गाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्यांचा मार्ग बदलला गेला.