औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सतत होत होती. पण पोलीस चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी फेसबुकच्या माध्यमातून संबंधांची कबुली दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही दिवसांनंतर रेणू शर्माने तिची तक्रार मागे घेतली. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला असून विरोधकही शांत झाले आहेत. तर आता धनंजय मुंडेंच्या या प्रकरणावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. 



''विषय मागे पडला आहे, नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करू शकत नाही, अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नाते म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशील पणे पाहते. हा विषय कोणाचाही असता तारी राजकीय भांडवल केलं नसते आणि करणारही नाही, बाकी सगळ्या गोष्टींचा निकाल भविष्यात लागेल.'' असं त्या म्हणाल्या.