COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल : 'झी २४ तास'ने थेट पनवेलमध्ये जाऊन 'आपलं शहर, आपलं आवाज' या कार्यक्रमासाठी चर्चा घडवून आणली. मात्र या कार्यक्रमाची सत्ताधारी भाजपने, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची धास्ती घेतली की काय?, असं म्हणता येईल कारण, सत्ताधीर भाजपकडून कोणताही प्रतिनिधी या कार्यक्रमात उत्तरे देण्यास किंवा बाजू मांडण्यास कार्यक्रमात आला नाही. सध्या पनवेल आयुक्त राज्यात चांगलीच चर्चेत आहे. कारण पनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.


मुंबईच्या वेशीवरचं या ऐतिहासिक पनवेल शहरात, महापालिका होऊनही शहरात पाण्याची टंचाई आहे, रस्त्यांच्या समस्या आहे, अनेक समस्या या शहरापुढे आहेत, या शहरात नव्यानेच महापालिका झाली आहे. या नव्या महापालिकेच्या कामकाजावर पनवेलकर खुश आहेत का? या आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमात घेतलेला हा आढावा.