... ही ठरलीय संपूर्ण दारुबंदीचा ठराव मंजूर करणारी पहिली महापालिका!
पनवेल महानगर पालिकेतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूबंदी व्हावी, यासाठीचा ठराव आज महासभेत मांडण्यात आला.
पनवेल : पनवेल महानगर पालिकेतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूबंदी व्हावी, यासाठीचा ठराव आज महासभेत मांडण्यात आला.
या ठरावाला सत्ताधारी व विरोधकांनी पाठिंबा देत दारूबंदी चा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. अशा प्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिली महानगर पालिका असल्याचं सांगितलं जातं आहे.
अंतिम निर्णयासाठी हा ठराव राज्य सरकार कडे पाठविण्यात येणार असून यावर राज्य सरकार काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या निर्णयामुळे पनवेलकर नागरिक आनंदित असले तरी हा व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच तळीराम मात्र नाखूष होणार आहेत.