कल्याण : एलफिन्स्टन-परळ पुलावर झालेल्या दुर्घटनेत कल्याणच्या श्रद्धा वरपे तरुणीला जीव गमवावा लागला. 'पप्पा तुम्ही जा, मी येते' हे तिने उद्गारलेले शेवटचे शब्द.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ वर्षीय श्रद्धा एलफिन्स्टनला कामगार कल्याण विभागात कामाला होती. तिचे वडीलही तिथेच कामाला होते. रोजच्या रुटीनप्रमाणे ती कल्याण-परळ प्रवास करुन ब्रिजवर आली. मात्र गर्दी असल्याने तिने आपल्या पप्पांना तुम्ही जा मी येते गर्दी कमी झाल्यावर असे सांगितले. 


मात्र हे तिचे शब्द अखेरचे ठरले. गर्दीतून श्रद्धाचे वडील पुढे निघून गेले. मात्र श्रद्धा अडकली. वडील किशोर यांनी तिला हाक मारली मात्र गर्दी कमी झाल्यावर येते असं ती म्हणाली. मात्र पुढच्या १० मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. डोळ्यासमोर आपल्या मुलीचा जीव जात होता मात्र तो बाप काही करु शकला नाही.