महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया; शरीरातील घाण खेचून बाहेर काढतील

महिलांसाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या समस्या किंवा पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतता. अशावेळी आळशीच्या बिया फायदेशीर असतात. 

Jun 07, 2024, 17:04 PM IST

महिलांसाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या समस्या किंवा पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतता. अशावेळी आळशीच्या बिया फायदेशीर असतात. 

1/7

महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया; शरीरातील घाण खेचून बाहेर काढतील

Flax seeds are beneficial for women health

महिलांनी आळशीच्या बियांचे सेवन नक्की करावे. कारण यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळतात. जे शरीरातील घाण खेचून बाहेर काढतात. त्यामुळं शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. 

2/7

Flax seeds are beneficial for women health

आळशीच्या बिया महिलांसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. भारतातील लोकप्रिय न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळशीच्या बियांमध्ये हार्मोनल संतुलीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळं ज्यांना अनियमित पाळीची समस्या असेल त्यांनी आळशीच्या बियांचे सेवन करावेय

3/7

आळशीच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक महिलेला घनदाट आणि चमकदार केस हवे असतात. त्यासाठी आळशीच्या केसांचे तेल लावावे. या तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. जे आरोग्याबरोबर केसांनादेखील पोषण देते. 

4/7

अनेक महिलांना पोटासंबंधी तक्रारी जाणवतात. अशावेळी पाण्यात भिजवलेल्या आळशीच्या बियांचे सेवन करावे. रात्रभर आळशीच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा सकाळी हे पाणी प्यायल्यास पोटासंबंधी तक्रारी दूर होतात.   

5/7

वजन कमी करण्यासाठीही आळशीच्या बिया खूप फायदेशीर असतात. आळशीच्या बियांमध्ये ओमेगा फॅट आणि फायबरचा उच्च स्त्रोत असतो. त्यामुळं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.   

6/7

आळशीच्या बियांचे सेवन केल्यास हृदयासंबंधी आजार दूर ठेवण्यास मदत होते. आळशीच्या बियांची पावडर करुन पाण्यात टाकून हे पाणी प्या. आळशीच्या पाण्याचे सेवन रोज सकाळी केले पाहिजे. 

7/7

Disclaimer

Flax seeds are beneficial for women health

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)