शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर उधळली पत्रकं
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर पत्रकं उधळण्यात आली. अहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केलं.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर पत्रकं उधळण्यात आली. अहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केलं.
सोलापूर शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रमात हे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांच्या गोंधळाने हा कार्यक्रम काही काळ तावडेंनी थांबवला आणि त्यांना घोषणा देणाऱ्यांना अडवू नका असं पोलीसांना सांगितलं. हा केवळ प्रसिद्धीसाठीची धडपड असल्याचे सांगितलंय. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर, श्री सिद्धेश्वर, माता जिजाऊं नाव देण्याचे प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.