`...तर आकाच्या आकानेही तुरुंगात जाण्याची तयारी करावी`; सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा
Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.
Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,बीडचे खासदार बजरंग सोनवणे,परभणीचे खासदार संजय जाधव,आमदार सुरेश धस,संदीप क्षीरसागर, राहुल पाटील यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मकोको लागला पाहिजे. एकदा आत गेला की 5-6 वर्षे पुन्हा माघारी येत नाही. आका तर आता गेलाच पाहिजे. आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तोपण आत गेला पाहिजे. छत्रपती संभाजीराजेंना ज्याप्रमाणे हालहाल करुन मारले त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मी दोघांची तुलना करत नाही पण तो फक्त दलित समाजाची बाजूला घ्यायला होता. हा व्हिडीओ आकाला दाखवला होता. पण तो आकाच्या आकालादेखील दाखवला असेल तर आकाने तुरुंगात जायची तयारी करा.
जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असे आकाचे आका म्हणतायत पण आधीच चांगलं वागायचं, असंही त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, असे सुरेश धस म्हणाले. हत्या कोणी घडवून आणल्या? मास्टरमाइंड कोण? हे माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीत पाठवा. 200-500 कुटूंब घर सोडून गेले. ते जीव मुठीत राहिले आहेत, असे सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.