मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांबाबत तसेच स्वत:च्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हायकोर्टात जाण्याचा आदेश परमबीर सिंह यांना दिला. त्यानंतर आज त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


परमबीर सिंह यांच्या याचिकेत कोण-कोणत्या मागण्या? 


1. गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी
२. मुंबई पोलिस आयुक्तपदावरून झालेली बदली बेकायदेशीर ठरवावी
३. पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावे


दरम्यान वसुलीच्या आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीची मागणी परमबीर सिंह यांच्यासह सातत्याने भाजपकडूनही होत आहे. त्यावर काल रात्री उशिरा ट्विट करत गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर चौकशी लावावी, एकदा काय ते दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे!


 



परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्र्यांवर आरोप केलेले की, अनिल देशमुखांनी मुंबईतील हॉटेल-बारमधून दरमहा १०० कोटी वसूल करण्याचे सचिन वाझेंना टार्गेट दिले होते.