परभणीचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला लाच घेतल्याप्रकरणी अटक
परभणीमध्ये उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय.
परभणी : परभणीमध्ये उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय.
२ लाखांची मागणी
पाझर तलावात ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली त्या शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी संयुक्तिक अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचा होता, तो अहवाल पाठविण्यासाठी गायकवाडने तक्रारकर्त्या शेतकऱ्याकडे २ लाखांची लाच मागीतली होती. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचं ठरलं होतं.
शेतक-याची तक्रार
शेतकऱ्याने परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपजिल्हाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार केली होती. एसीबीने सुद्धा तत्परता दाखवत एका दिवसात कारवाई केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे भूसंपादनचा सुद्धा अतिरिक्त कारभार आहे. सदर घटनेमुळे अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे.