मुंबई : धक्कादायक बातमी एका व्हायरल व्हिडिओची. हा व्हिडीओ तुमचा काळजाचा थरकाप उडवेल. या व्हिडीओत पालकांचा निष्काळजीपणा मुलाच्या जीवावर बेतल्याच समोर आलं आहे. बाईकचा स्टँड निसटल्याने मुलगा बाईकवरून पडला. आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चिमुकल्याला दुचाकीवर एकटे सोडणं महागात पडलं आहे. २ डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. साईड स्टँडला लावलेल्या बाईकवर या बाळाला ठेवलं होतं. मुलगा गाडीवर एकटाच होता. मात्र अचानक स्टँड निसटला आणि बाळ रस्त्यावर पडलं.



नेमका त्याच वेळी मागून ट्रक येत होता आणि ट्रकची ३ ते ४ चाकं बाळावरून गेली. या धक्कादायक घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


आपली एक चूक किती महागात पडू शकते हे या व्हिडीओतून कळतं. मुलांना प्रवासात नेताना पूर्ण काळजी घ्या. तुमचं संपूर्ण लक्ष मुलांकडे असणं अत्यंत गरजेचं असतं. काही क्षणाचा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडला आहे.