viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!
यवतमाळच्या लाडखेड गावात एका आईवडिलांनी आपल्या मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची प्रतिकात्मक धिंड काढली.
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : सध्या समाजात अनेक भीषण प्रकार घडत असतात. त्यामुळे आपला समाज अधिकच हादरून जातो. मारामारी, भांडणं, कलह, शिव्याशाप, दूश्मनी, खुन्नस, द्वेष या सगळ्या गोष्टींमुळे समाजात अनेक प्रकार घडत असतात. त्यातून आजही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं जातं. आजच्या युगातही (domestic violence) स्त्रियांना समाजात चुकीची आणि अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांना अनेकदा घरगुती हिंसाचारांना सामोरे जावे लागते. तर कधी लग्न करून सासरच्या मंडळींचा त्रास सहन करावा लागतो. मुलींना आधी आपल्या वडिलांचा धाक सहन करावा लागतो त्यानंतर मित्राचा मग प्रियकाराचा (boyfriend) आणि नंतर आपल्या जोडीदाराचाही. (Life Partner) आज सासरीची मंडळी कितपत आपल्या सुनेला एखाद्या मुलीसारखं वागवतात? त्यामुळे मुलींना कायमच वेगवेगळ्या पातळीवर निंदानालस्ती सहन करावी लागते आणि अपमानही सहन करावा लागतो.
सध्या समोर आलेल्या घटनेतून हेच बाहेर आलं आहे. आपल्या सूनेला मुलीप्रमाणे वागवणं तर दूसरच. परंतु आपल्या सुनेचा सासरची मंडळी वारंवार अपमान करत आली आहेत. सासरच्या घरात राबराब राबूनही त्या सुनेला मात्र मनमोकळं आयुष्य जगता येत नव्हतं. आपल्या या मुलीचा त्रास सहन न (mother in law) झाल्यानं शेवटी तिच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींची जाहीर धिंड काढण्याचे ठरविले.
व्हिडिओतून सर्व प्रकार समोर...
समोर आलेल्या व्हिडिओतून हेच दिसते की मुलीला होणाऱ्या त्रासामुळे शेवटी तिच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींची जाहीर धिंड काढली पण तीही प्रतिकात्मक. त्यांचे फोटो घेत त्यांचे बॅनर बनविले आणि त्याची अख्ख्या गावासमोर धिंड काढली. त्या पिडीत महिलेनं तिला तिचे सासरचे कसा त्रास देत होते याबद्दल सांगितले. आणि त्यांच्या बॅनरला आगही लावली.
नक्की काय घडलं?
यवतमाळच्या लाडखेड गावात एका आईवडिलांनी आपल्या मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची प्रतिकात्मक धिंड काढली. जावई आणि सासऱ्याच्या प्रतिमा गावभर फिरवून त्याला काळे फासत दहन केले. तसेच गावात ''एका मुलीच्या बापाची आत्मकथा'' असा मथळा छापलेले पत्रक वितरित केले.
5 महिन्यांपूर्वी त्यांच्या उच्चशिक्षित मुलीचा विवाह लाडखेड येथील एमबीबीएस झालेल्या व वैद्यकीय अधिकारी असलेल्या युवकाशी झाला. मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात खटके उडाले. त्यामुळे विवाहिता माहेरी परतली मात्र समेट घडविण्याऐवजी सासरे व पतीने मुलीची बदनामी सुरू केल्याचा आरोप मुलीच्या माता पित्यानी केला. व सासरी लाडखेड मध्ये पत्रक वाटून सासरा व जावयाच्या प्रतिमेची धिंड काढली.