Swapnil Kusale Bags Bronze: महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक क्षण आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या स्वप्निल कुसळेने कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये पदकावर आपलं नाव कोरलं आहे. ऑलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्निलच्या या विजयाने 1952 नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये 451.4 पॉइंण्टंस पटकावले आहेत. पहिल्या पात्रता फेरीमध्ये चीनच्या लियूने सुवर्णपदक पटाकवले असून युक्रेनच्या सेरहिय कुशिकने 461.3 पॉइण्ट्स मिळवत सिल्व्हर मेडल मिळवलं आहे. स्वप्निल कुसळे यांने अखेरच्या फेरीमध्ये तिसरं स्थान निश्चित केलं आहे. स्वप्निलच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. 


स्वप्निल कुसळेची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान गाजवणाऱ्या स्वप्निलचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदर मिळवून दिलं आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रात  ऑलिम्पिक मेडल येण्यासाठी तब्बल 72 वर्षे लागली. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील समर ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझ पदक पटकावले होते. 


कोण आहेत खाशाबा जाधव?


खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाईल बॅटमवेट कुस्ती गटात कांस्यपदक पटकावले होते. खाशाबा जाधव यांच्या रुपाने भारताने पहिल्यांदाच वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा मान मिळाला. 23 जुलै 1952 साली भारताला हा सुवर्णक्षण मिळाला होता. एका मराठमोळ्या खेळाडूने हा मान भारताला मिळवून दिला होता. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकासाठी भारताला तब्बल 44 वर्षे वाट पाहावी लागली होती. 


खाशाबा जाधव यांचे मूळ गाव कराडजवळील गोळेश्वर गावातील. वयाच्या 5व्या वर्षांपासूनच खाशाबा कुस्तीचे बारकावे शिकू लागले होते. टिळक विद्यापीठात 1940 ते 1947 दरम्यान शिक्षण पूर्णकेल्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रीत केले. 


घर गहाण ठेवून घेतला ऑलिम्पिकमध्ये सहभाग 


खाशाबा जाधव यांनी 1948 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तेव्हा कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांच्या लंडन दौऱ्याचा खर्च केला होता. मात्र, तेव्हा कुस्तीमध्ये ते एकही सामना जिंकू शकले नाही. त्यानंतर 1952 साली ते पुन्हा हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जायची संधी मिळाली. मात्र तिथे जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसै नव्हते. त्यासाठी त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले. तरीही पैसे कमी पडले तेव्हा त्यांनी आपले घर गहाण ठेवले. एक एक रुपया खर्च करुन खाशाबांनी दुसऱ्यांना ऑलिम्पिकला जाण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वीदेखील झाला.